जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथील श्री विजय राऊत यांचे सुयश
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथील श्री विजय राऊत यांचे सुयश
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, कोरपना : दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल एन डी चंद्रपूर येथे आयोजित शिक्षक सन्मान कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा सोनुर्ली येथील विषय शिक्षक श्री विजय गणपतराव राऊत यांचा शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांचे हस्ते मानपत्र व लॅपटॉप प्रदान करून सन्मान करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
लीडरशिप फार इक्विटी पुणे, जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर्स या प्रकल्पांतर्गत CSTE या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. या कोर्समध्ये संगणकीय विचार, तार्किक विचार ,कोडींग आणि सिक्वेन्सीग यासारख्या घटकांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासक्रमास चंद्रपूर जिल्ह्यातून 757 शिक्षकांनी नोंदणी केली होती. या शिक्षकांपैकी 220 शिक्षकांनी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून टॉप 20 शिक्षकांची निवड बक्षीसांसाठी करण्यात आली होती.
या शिक्षकांमध्ये अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथील विषय शिक्षक श्री विजय गणपतराव राऊत यांनी टॉप फोर मध्ये क्रमांक पटकावत आपले अव्वल स्थान मिळविले आहेत. यासाठी त्यांना हॉटेल एन डी चंद्रपूर येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात ,शिक्षणाधिकारी माध्यमिक सन्माननीय राजेश पाताळे आणि उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सन्माननीय विशाल देशमुख साहेब, ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर चे मनकुणाल सर, तुकाराम सर, आणि त्यांची संपूर्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत, मानपत्र आणि लॅपटॉप प्रदान करून श्री विजय गणपतराव राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
पंचायत समिती कोरपणाचे संवर्ग विकास अधिकारी सन्माननीय विजय पेंदाम साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री मालवी साहेब, मुख्याध्यापक श्री बाळा बोढे यांचेकडून मिळणारे प्रोत्साहन शिक्षण विस्तार अधिकारी श्री कल्याण जोगदंड साहेब, केंद्रप्रमुख श्री विलास देवाळकर साहेब , यांचे मार्गदर्शन यांच्यामुळे आपल्याला हे यश मिळाले असे यावेळी आमच्या वार्ताहराशी बोलताना श्री राऊत यांनी सांगितले.
*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथील श्री विजय राऊत यांचे सुयश*
उत्तर द्याहटवाकोरपना:दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल एन डी चंद्रपूर येथे आयोजित शिक्षक सन्मान कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा सोनुर्ली येथील विषय शिक्षक श्री विजय गणपतराव राऊत यांचा शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांचे हस्ते मानपत्र व लॅपटॉप प्रदान करून सन्मान करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
लीडरशिप फार इक्विटी पुणे, जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर्स या प्रकल्पांतर्गत CSTE या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. या कोर्समध्ये संगणकीय विचार, तार्किक विचार ,कोडींग आणि सिक्वेन्सीग यासारख्या घटकांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासक्रमास चंद्रपूर जिल्ह्यातून 757 शिक्षकांनी नोंदणी केली होती. या शिक्षकांपैकी 220 शिक्षकांनी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून टॉप 20 शिक्षकांची निवड बक्षीसांसाठी करण्यात आली होती. या शिक्षकांमध्ये अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथील विषय शिक्षक श्री विजय गणपतराव राऊत यांनी टॉप फोर मध्ये क्रमांक पटकावत आपले अव्वल स्थान मिळविले आहेत. यासाठी त्यांना हॉटेल एन डी चंद्रपूर येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात ,शिक्षणाधिकारी माध्यमिक सन्माननीय राजेश पाताळे आणि उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सन्माननीय विशाल देशमुख साहेब, ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर चे कुणाल सर, तुकाराम सर, आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या प्रमुख उपस्थितीत , मानपत्र आणि लॅपटॉप प्रदान करून श्री विजय गणपतराव राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पंचायत समिती कोरपणाचे संवर्ग विकास अधिकारी सन्माननीय विजय पेंदाम साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री मालवी साहेब, मुख्याध्यापक श्री बाळा बोढे यांचेकडून मिळणारे प्रोत्साहन शिक्षण विस्तार अधिकारी श्री कल्याण जोगदंड साहेब, केंद्रप्रमुख श्री विलास देवाळकर साहेब , यांचे मार्गदर्शन यांच्यामुळे आपल्याला हे यश मिळाले असे यावेळी आमच्या वार्ताहराशी बोलताना श्री राऊत यांनी सांगितले.